व्यवसाय सुरु करताना
लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी
१. वेळ - तुम्ही व्यवसायाला पुरेसा वेळ देऊ शकत असाल तरच व्यवसाय
सुरु करा.
२. एकाच ठिकाणी १८ तास काम करण्याची तयारी - एकाच ठिकाणी दिवसातील
१८ तासांपेक्षाही जास्त वेळ काम करण्याची तयारी हवी. व्यवसायात काही वेळेस अशा घटना
घडतात कि तुम्हाला त्यासाठी तहान भूक विसरून तासंतास काम करत राहावे लागते.
३. ग्रहण क्षमता, संवाद कौशल्य - तुमच्यात उत्तम ग्रहण क्षमता असणे आवश्यक आहे. कमी बोलणे आणि जास्त
ऐकणे हे उत्कृष्ट संवाद कौशल्याचे गमक आहे.
४. रागावर नियंत्रण - यशस्वी व्यवसायासाठी तुमचे स्वतःच्या रागावर
नियंत्रण असणे आवश्यक आहे.
५. आळस नसावा - कोणत्याही कामासाठी आळस नसावा. कंटाळा आला म्हणून
एखादे काम पुढे ढकलणे हे व्यवसायाला ओहोटी लावते.
६. नुकसानीची मानसिकता - व्यवसायात नुकसान होतंच असते. त्यामुळे
नुकसान झाले म्हणून खचून जाऊ नये. नुकसानाला खंबीरपणे सामोरे जाण्याची तयारी हवी.
७. आत्मविश्वास - यशस्वी व्यवसायासाठी आत्मविश्वास आवश्यक असतो.
कोणत्याही बाबीत नकारात्मकता तुम्हाला स्पर्धेमधे पिछाडीवर नेते.
८. न्यूनगंड - न्यूनगंड हे व्यवसायातील अपयशाचे सर्वात मोठे
कारण आहे. कोणत्याही गोष्टींमधे स्वतःला कमी समाजने हे तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम
कार्यापासून परावृत्त करते. न्यूनगंडापासून वेळीच लांब जाणे व्यवसायासाठी आवश्यक असते.
९. संयम - संयम असेल तर तुम्ही कठिणातील कठिन प्रश्न मार्गी
लावु शकता. परिस्थीती कशीही असली तरिही कोणत्याही परिस्थितीत संयम न गमावणारा यशस्वी
होतोच.
१०. स्व प्रतिमा - तुमच्या वैयक्तीक प्रतिमेचा तुमच्या व्यवसायावर
परिणाम होत असतो, त्यामुळे तुमची समाजातील
प्रतिमा कधीही बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
तुम्हाला यशस्वी व्यावसायिक व्हायचे असेल* तर या किमान बाबींची
पूर्तता करणे आवश्यक आहे. स्वतःमधे आवश्यक ते परिवर्तन करून स्वतःला व्यवसाय योग्य
बनवणे आवश्यक आहे.
विश्वास ठेवा; यश तुमचेच असेल.
अशोक सोनकुसळे
No comments:
Post a Comment