निवृत्ती नियोजन काळाची गरज
जीवनात आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेत असतो आणि आपल्या
कुटुंबीयांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी धडपड करत असतो. मात्र, आपल्या
निवृत्तीनंतर आपण कसे आयुष्य जगू याचे नियोजन करतो का? आपण निवृत्त कामातून होतो खर्चातून
नाही. आणि म्हणून निवृत्ती नियोजन ही काळाची गरज आहे.
भारतीयांचा
विचार केल्यास त्यांच्यासाठी निवृत्ती नियोजनाचे आयुष्यात खूप महत्त्व आहे. त्याची काही
कारणे अशी –
सक्तीच्या
पेन्शनचा अभाव : भारतातील बहुसंख्य लोक हे व्यावसायिक
असतात किंवा असंघटीत क्षेत्रात काम करतात. त्यांना राज्य सरकार किंवा नोकरी देणाऱ्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या पुरेसा पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही.
आयुष्याकडून
वाढलेल्या अपेक्षा : आपल्या आयुष्याकडून आपल्या अपेक्षा
वाढतच आहेत. लवकर
निवृत्त होण्याची स्वप्ने आपण पाहात आहोत. लवकर निवृत्ती म्हणजेच निवृत्तीनंतरच्या
आयुष्याचा टप्पा अधिकाधिक असणे.
विभक्त
कुटुंब पद्धतीचे वाढते प्रमाण : 'द
फ्युचर ऑफ रिटायरमेंट रिपोर्ट-इंडिया
फॅक्ट शीट - २०११' मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ३२
टक्क्यांहून अधिक लोक निवृत्तीनंतर आपल्या मुलांसोबत राहू इच्छितात.
भारतात
ही संख्या जागतिक सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे. मात्र, खासकरून
शहरी भागात विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे आणि त्यामुळेच
प्रत्येकाला आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आतापासूनच तरतूद करून ठेवावी
लागणार आहे.
जगण्यासाठी
लागणाऱ्या
खर्चाचा वाढता आलेख : वाढती महागाई,
चांगले आयुष्य जगण्याच्या वाढत्या महत्वाकांक्षा, आरोग्यसेवांचे वाढते दर यांमुळे
निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करणे अनिवार्य झाले आहे.
निवृत्तीनंतर
चांगले आयुष्य जगण्यासाठी याचे नियोजन लवकरात लवकर करणे आवश्यक आहे.निवृत्तीचे नियोजन कसे करावे.....
·
पाऊल पहिले : निवृत्तीनंतर आपल्याला चांगले आयुष्य
जगण्यासाठी किती रक्कम लागणार आहे, हे ठरवा. मात्र, हे
ठरवताना वाढणारी महागाई, आरोग्य सेवांचा
वाढलेला खर्च, सुटय़ा आणि कुटुंबासाठी भेटवस्तू
यांचाही विचार करून ठेवा. मुलांच्या
शिक्षणाचा खर्च आणि घरखर्च , जर तुमचे स्वत:चे घर खरेदी केलेले असेल तर त्याचा खर्च गृहीत धरा.
·
पाऊल दुसरे : निवृत्तीनंतरही तुम्ही ठरवलेले उत्पन्न मिळत
राहावे यासाठी किती रक्कम हवी, याचे गणित मांडा.
·
पाऊल तिसरे : यासाठी तुम्हाला नियमित किती रुपये बचत करावे
लागतील, याचाही विचार करा. तुमच्याकडे जर वेळ असेल तर लगेच बचतीला
सुरुवात करा.
·
पाऊल चौथे : योग्य निवृत्ती योजनेची निवड करा. ज्यातून तुमच्या निवृत्तीनंतरच्या गरजा
पूर्ण होतील.
अशोक सोनकुसले
विकास अधिकारी भारतीय आयुर्विमा महामंडळ ,
ठाणे विभाग
No comments:
Post a Comment